गागाभट्टकृत शिवराज्याभिषेक प्रयोग – लेखक – वा. सी बेंद्रे

200.00

वा.सी. बेंद्रे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी ९० वर्षांच्या काळात ५७ हून अधिक ऐतिहासिक ग्रंथ रचले. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता, विशेषत: भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप देण्यात. बेंद्रेंनी पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले. त्यांच्या संशोधनातून तयार झालेली काही दुर्मिळ ग्रंथसंपदा पुन्हा प्रकाशित झाली आहे, ज्यात ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘शिवराजाभिषेक प्रयोग’, ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचा समावेश आहे.

SKU: गगभटटकत-शवरजयभषक-परयग-लखक-व-स-बदर Category:

Description

महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले सहा ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराजाभिषेक प्रयोग’,‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘छत्रपती राजाराम महाराज’ हे सहा ते सहा ग्रंथ होय. ~ धार्मिक, सामाजिक व राजकीय व्यवहारात नैतिक व संघटनात्मक उत्क्रांत संस्कृतीची बीजे रोपित आणि अंकुरित करण्याचे कार्य शिवाजी महाराज व त्यांचे प्रागतिक कदाचित क्रांतिवादी साहाय्यक यांनी केले. संत आणि हे राजव्यवहारतज्ञ कर्मधर्मसंयोगाने या शतकात एकाच वेळी एकमेकांना पूरक कार्य करीत राहिले आणि त्यामुळेच हा योग महाराष्ट्राच्या सर्वांगीण संस्कृतीला थोड्याच अवधीत उत्क्रांतावस्थेस नेण्यास समर्थ व कारणीभूत झाला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गागाभट्टकृत शिवराज्याभिषेक प्रयोग – लेखक – वा. सी बेंद्रे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?