मराठी असल्याचा तुम्हाला अभिमान आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे नाव ऐकताच तुमचे रक्त उसळ्या मारते? तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसारखे रत्नपारखी राजे जगात झाले नाही. वरवर अत्यंत सामान्य वाटणारया माणसांतले गुण हेरून महाराजांनी त्यांच्यातून स्वराज्यासाठी रत्ने मिळवली. हिंदूस्थानला आपल्या घोड्यांच्या टापांखाली रगडणार्याच मोगल, अफ़गाण, तुर्क, अरबांना ज्यांनी सडेतोड जवाब देऊन मराठ्यांचे साम्राज्य संपुर्ण हिंदूस्थानात वाढवले त्या आपल्या थोर पूर्वजांचा इतिहास, रणभूमीवरील स्मारके, समाध्या तसेच त्यांच्या सध्याच्या वंशजांची माहिती वंशावळीसह प्रथमच…
शहाजीराजांपासून यशवंतराव होळकरांपर्यंतच्या पराक्रमी मराठ्यांचा इतिहास आणि तीन वर्षाहून अधिक कालखंडामध्ये पाच राज्यांमधून घेतलेला समाध्यांचा शोध (महाराष्ट्र,मध्य प्रदेश,कर्नाटक,उत्तरप्रदेश,गुजरात).प्रत्येक मराठी माणसांच्या घरी असावे असे पुस्तक. पुस्तक खरेदी करुन गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपलाही हातभार लावा.
सदर पुस्तकात खालील शूर सेनानींचा इतिहास,स्मारके,समाध्या तसेच त्यांच्या सध्याच्या वंशजांची माहिती आणि वंशावळीचा समावेश आहे.
(छत्रपती शहाजीराजे भोसले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजीराजे भोसले, महाराणी सईबाई, छत्रपती संभाजीराजे, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसुबाई, छत्रपती राजाराम, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहूराजे, फलटणचे राजे नाईक-निंबाळकर, जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले, बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी तथा सर्जेराव जेधे, सरनौबत नेताजी पालकर, बाबाजी धुमाळ-आढळराव, खेडेबाऱ्याचे कोंडे देशमुख, सरनौबत प्रतापराव गुजर, सरनौबत हंबीरराव बाजी मोहिते,
सरनौबत येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बर्हिजी नाईक, हिरडस मावळचे बांदल देशमुख, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी प्रभू, पिलाजीराव सणस देशमुख, फिरंगोजी नरसाळा, सुर्यराव काकडे, जीवा महाला, महाडिक तारळे(प्रांत कऱ्हाड), संभाजी कावजी कोंढाळकर, रामजी पांगेरा, कोंडाजी फर्जंद, दर्यावीर मायनाक भंडारी, दर्यावीर लायजी पाटील, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर, गोदाजी जगताप, दर्यासारंग दौलतखान, सिद्दी हिलाल, संतोजीराजे भोसले, मकाजी आनंदराव, रघूनाथ हणमंते, जर्नादन हणमंते, कवी कलश, नावजी बलकवडे, जोत्याजी केसरकर, दर्याराजे कान्होजी आंग्रे, म्हाळोजी घोरपडे, सेनापती संताजी घोरपडे, राणोजी घोरपडे,
बर्हिजी घोरपडे, सिधोजी आणि मुरारराव घोरपडे, सेनापती धनाजी जाधव, शंभूसिंग जाधव, रायाजी जाधव भूईंजकर, रामचंद्रपंत अमात्य, चांदजीराव पाटणकर, शंकराजी नारायण पंतसचिव, परशूराम प्रतिनिधि, बाळोजी नाईक ढमाले, संताजीराव सिलीमकर, नेमाजी शिंदे, छत्रपती संभाजीराजे दुसरे, अक्कलकोटकर फत्तेसिंह भोसले, नागपूरकर रूपाजी भोसले, सेनासाहेबसुभा रघूजी भोसले, सेनाखासखेल खंडेराव दाभाडे,
सेनापती उमाबाई दाभाडे, पहिले बाजीराव पेशवे, सदाशिवराव भाऊ पेशवे, थोरले माधवराव पेशवे, मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, यशवंतराव होळकर, धार आणि देवासचे पवार, राणोजी शिंदे, महादजी शिंदे, सेनाखासखेल पिलाजी गायकवाड, दमाजी गायकवाड, अटकविजयवीर मानाजी पायगुडे, हिम्मतबहादर उदाजी चव्हाण, पुणे प्रांताचे राजा शितोळे देशमुख, अंकलीकर शितोळे देशमुख.)