Showing 1–16 of 26 results
-

₹500.00
क्षात्रतेज या पुस्तकाचे वैशिष्ट्य…. १) मराठा साम्राज्याच्या सरसेनापतींवर सचित्र कॉफी टेबल बुक प्रथमच प्रकाशित होत आहे. २) या पुस्तकात प्रथमच प्राचीन भारतीय राजनीती, तत्त्वज्ञान आणि मराठा साम्राज्याची राजनीती यांचा संबंध जोडण्याचा हा प्रयत्न आहे. ३) क्षत्रिय मराठा राज्यकर्त्यांच्या शिक्षणावर प्रकाश टाकणाऱी समकालीन पुराव्यावर आधारित माहिती प्रथमच प्रकाशित करण्यात येत आहे. ४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४०…
-

₹240.00
गड-किल्ल्यांचा इतिहास म्हणजे युध्दाच्याच कथा. इतिहासकालीन गड-किल्ल्यांच्या वास्तुशास्त्रात महाराष्ट्रात झालेली प्रगती अभिमान वाटण्यासारखीच होती. या पुस्तकात गड कोटांचा प्राचीन इतिहास, शिवशाहीतील वास्तूशास्त्र, शिवशाहीतील गडकोटांचे महत्व तसेच आकाशभैरवकल्प:, अभिलाषितार्थचिंतामणि:, कौटिलीय अर्थशास्त्रम मधील गड-कोट-दुर्ग संदर्भातील उपयुक्त भाग परिशिष्ट म्हणुन जोडला आहे आणि सभासद बखरीतील शिवशाहीतील किल्ल्यांची यादि देखील संबंधीत पुस्तकात उपलब्ध आहे. पाने : ११२ । किंमत : २४०/- । लेखक : वा. सी. बेंद्रे
-

₹999.00
गडकिल्ले आणि मी = छत्रपती शिवरायांच्या आणि गडकोटांच्या उत्कट प्रेमापोटीच महाराष्ट्रभर पसरलेल्या साधारण चारशे गडकोटांपैकी १०१ गडकिल्ल्यांना अनेक वेळा प्रत्यक्ष भेटी देऊन, इतिहासाच्या जीर्ण कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास रात्रंदिवस एक करून शोधून काढून “गडकिल्ले आणि मी” हा ग्रंथ डॉ. संग्राम इंदोरे यांनी जन्माला घातला आहे. या ग्रंथातला साल्हेर हा नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र गुजरात सीमेवर उभा आहे तर पारगड कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र गोवा सीमेवर जंगलात दडला आहे. या मधल्या सह्याद्रीच्या प्रचंड पसाऱ्यात बुद्धिबळाच्या पटावरच्या सैन्यांसम पसरलेल्या गडकोटांच्या अनगड वाटा आपल्याशा करणं, गडकोटांचा एकूण एक कोपरा धुंडाळणं, त्याची नोंद करणं आणि त्या गडकोटांवरील अवशेषांचे सुंदर फोटो घेणे हे अत्यंत जिकीरीचं कार्य. पण डॉक्टरांनी ते अतिशय उत्तम रित्या जमवलं. त्यांच्या ओघवत्या लिखाणाला त्यांच्याच सुंदर छायाचित्रांनी चार चांद लावले आहेत. दुर्गराज राजगड= या पुस्तकात किल्ले राजगडाचे आणि महत्त्व हे गडाच्या रुपासह या पुस्तकरुपी ग्रंथात सांगितले आहे.
-

₹995.00
महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा संपूर्ण पट मांडणारे “गडकिल्ले महाराष्ट्राचे” हे पुस्तक प्रत्येक शिवभक्त, इतिहासप्रेमी, किल्लेप्रेमी, गिर्यारोहक आणि संशोधकांसाठी एक अनमोल ठेवा आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्ये: संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास एका ठिकाणी: महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधील तब्बल ९३१ किल्ल्यांची माहिती आणि त्यांचे विस्तृत वर्णन या ग्रंथात समाविष्ट आहे. भरगच्च छायाचित्रसंपदा: प्रत्येक किल्ल्याचे विस्तृत फोटो गॅलरीसह सखोल तपशील आणि त्यांचे…
-

₹200.00
वा.सी. बेंद्रे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी ९० वर्षांच्या काळात ५७ हून अधिक ऐतिहासिक ग्रंथ रचले. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा होता, विशेषत: भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप देण्यात. बेंद्रेंनी पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले. त्यांच्या संशोधनातून तयार झालेली काही दुर्मिळ ग्रंथसंपदा पुन्हा प्रकाशित झाली आहे, ज्यात ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘शिवराजाभिषेक प्रयोग’, ‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि ‘छत्रपती राजाराम महाराज’ यांचा समावेश आहे.
-

₹600.00
गोमंतकीय दुर्गांच्या वाटेवर – संदीप मुळीक Gomantakiya Durganchya Vatevar by Sandip Sadashiv Mulik Sandip Sadashiv Mulik | Marathidesha Foundation
-

₹1,300.00
वा.सी. बेंद्रे हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी ९० वर्षांच्या कालावधीत ५७ पेक्षा अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या ऐतिहासिक संशोधनाने आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत मोठा वाटा उचलला. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक रूप देण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारीही त्यांनी निभावली. त्यांनी लिहिलेल्या सहा ग्रंथांचे प्रकाशन नुकतेच झाले आहे. बेंद्रे हे कार्यमग्न संशोधक होते आणि त्यांनी वि.का. राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संशोधनाची परंपरा पुढे नेली.
-

₹2,400.00
वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधक परंपरेतील महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी ९० वर्षांच्या काळात ५७ हून अधिक ऐतिहासिक ग्रंथांची निर्मिती केली. ‘राजाराम महाराज चरित्र’ हे त्यांच्या ८० व्या वर्षी प्रकाशित झाले होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते. बेंद्रेंनी भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक रूप दिले आणि पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले. त्यांच्या संशोधनातील सहा महत्त्वाचे ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत.
-

₹350.00
शिवाजी महाराजांचे थोरले बंधु संभाजीराजे भोसले यांचे मराठीतील एकमेव ऎतिहासिक चरित्र. शहाजीराजांनी आपल्या थोरल्या पुत्राला (संभाजीराजाला) अगदी सातव्या आठव्या वर्षापासूनच राज्यांतर्गत क्रांतीचे शिक्षणानुभव देऊन शेवटपर्यंत आपल्याच बरोबर इरीरीने झगडावयास शिकवले होते. परकीय राजसत्तेचे उच्चाटन व स्वकीयांच्या स्वराज्याचे संस्थापन हे शहाजीराजे आणि शिवाजीराजांबरोबरच थोरल्या संभाजीराजांचे देखील ध्येय होते. याच ध्येयाने आपला कार्यभाग उत्तम प्रकारे साधणाऱ्या संभाजीराजांची किर्ती दुदैवाने लोकस्मृतीतून लोप पावली परंतु इतिहासाला मात्र एवढ्या श्रेष्ठ दर्जाच्या राष्ट्रसेवकाला विसरता येणार नाही. पाने : ११६ । किंमत : 350/- । लेखक : वा. सी. बेंद्रे
-

₹1,200.00
वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित इतिहास संशोधक आणि लेखक होते. त्यांनी ९० वर्षांच्या कार्यकाळात ५७ पेक्षा अधिक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांचे संशोधन महाराष्ट्राच्या इतिहासाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण ठरले. त्यांनी पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले आणि भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक रूप दिले. त्यांच्या लिखित ‘छत्रपती संभाजी महाराज’ या ग्रंथाने समाजात खळबळ उडवली होती. त्यांनी संभाजी महाराजांच्या इतिहासावर सुमारे ४० वर्षे संशोधन केले आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक साधने परत आणली.
-

₹350.00
शिवाजी महाराज व महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष, प्रजेविषयी कनवाळू आणि भारतीय राजनीतीचे सर्वंकष उद्गाते होते. तसेच ते संस्कृत भाषानिपुणही होते. त्यांनी ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. बहुगुणसंपन्न संभाजी महाराजांनी लिहिलेले संस्कृत साहित्य व त्याचे मराठी भाषांतर ‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ या ग्रंथातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे…
-

₹400.00
Tukaram Maharaj Yanche Santasangati – Vasudev Sitaram Bendre
-

-

₹160.00
पुरंदरचा तह या पुस्तकाचे मूळ लेखक महेंद्र खड्गावत असून, दामोदर मगदूम यांनी याचा मराठी अनुवाद केला आहे. या पुस्तकात पुरंदरच्या तहाचा विस्तृत अभ्यास करण्यात आला आहे, ज्यामध्ये शिवाजी महाराज आणि मुघल सरदार जयसिंग यांच्यातील तहाचे राजकीय, सामाजिक, आणि लष्करी परिणाम मांडले आहेत. ऐतिहासिक कागदपत्रे आणि पुरावे यांच्या आधारावर लिहिलेले हे पुस्तक पुरंदरच्या युद्धाच्या आणि तहाच्या महत्त्वपूर्ण घडामोडींवर प्रकाश टाकते.
-

₹1,200.00
वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन परंपरेतील एक महत्त्वाचे नाव आहेत. त्यांनी ९० वर्षांच्या कारकिर्दीत ५७ हून अधिक ऐतिहासिक ग्रंथसंपदा तयार केली आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप देण्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. बेंद्रेंनी पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन केले आणि त्यांचे संशोधनातून तयार झालेली ग्रंथसंपदा आता दुर्मिळ झाली आहे. नुकतेच त्यांच्या सहा ग्रंथांचे पुनःप्रकाशन झाले आहे, ज्यामध्ये ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराजाभिषेक प्रयोग’, ‘छत्रपती संभाजी महाराज’, आणि ‘छत्रपती राजाराम महाराज’ हे ग्रंथ समाविष्ट आहेत. शाहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला होता, आणि त्यांच्या पाठबळामुळेच शिवाजी महाराजांनी राज्याक्रमणास सुरुवात केली.
-

₹500.00
छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरमरणानंतर दक्षिणेत घोंगावणारा नरकेसरी.आलमगीर औरंगजेबाच्या काळजाला घोर लावणाऱ्या महान योध्याची अस्सल ऐतिहासिक चरितकहाणी. गनिमी काव्यातील सर्वोकृष्ट योध्दे सेनापती संताजी घोरपडे यांचे एकमेव चरित्र.